भुसावळात प्रफुल्ल लोढांच्या पुतळ्याला राष्ट्रवादी पदाधिकार्यांनी चपलांनी तुडवले
पुतळा दहनापूर्वीच पोलिसांनी घेतला ताब्यात : आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध
भुसावळ : राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यावर बेछूट आरोप करणार्या जामनेरातील प्रफुल्ल लोढा यांच्या वक्तव्याचा भुसावळातील राष्ट्रवादी पदाधिकार्यांनी निषेध व्यक्त पुतळ्याला चपलांनी तुडवले. पुतळा दहनापूर्वीच पोलिसांनी तो ताब्यात घेतला. जामनेर रोडवरील अष्टभूजा मंदिराजवळ रविवारी सकाळी झालेल्या आंदोलनानंतर पक्षाचे नेते व माजी मंत्री एकनाथराव खडसे यांची बदनामी खपवून घेणार नसल्याचे कृउबा सभापती सचिन चौधरी व शहराध्यक्ष नितीन धांडे म्हणाले.
यांची होती उपस्थिती
या आंदोलनात माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे, तालुकाध्यक्ष दीपक मराठे, संतोष माळी, ललित मराठे, जिल्हा परीषद सदस्य रवींद्र पाटील, दुर्गेश ठाकूर, रणजीत चावरीया, तम्मा पहेलवान आदी कार्यकर्ते उपस्थित होते.



