हिंगोण्यातील तरुणाचा मृत्यू ; पिता-पुत्रांची पोलिस कोठडीत रवानगी

फैजपूर : यावल तालुक्यातील हिंगोणा येथे किरकोळ कारणावरून एका 28 वर्षीय तरुणाला मारहाण झाल्याने त्याचा 7 रोजी मृत्यू झाला होता. या प्रकरणी मयताच्या आईने तक्रार दिल्यावरून सुभाष देविदास पाटील व सोनल सुभाष पाटील दोघ (हिंगोणा) या पिता-पूत्रांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना रविवारी अटक करण्यात आली होती. सोमवारी आरोपींना यावल न्यायालयात सहा.निरीक्षक प्रकाश वानखडे यांनी हजर केल्यानंतर न्यायालयाने त्यांना 13 पर्यंत पोलिस कोठडी सुनावली.




