खिर्डीत शौचालयाची दुरवस्था : ग्रामपंचायत प्रशासन बेदखल


खिर्डी : गावातील बाजारपट्टा गट क्रमांक तीनमधील पडीत जागेवर शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून शौचालयाचे बांधकाम करण्यात आले मात्र केवळ पाणी नसल्याने त्याचा वापर थांबला आहे शिवाय गेल्या अनेक वर्षांपासून वापरात नसलेल्या शौचालयाच्या परीसरात मोठ्या प्रमाणावर गवत वाढले असून उकीरडा तयार झाल्याने शौचालयात जाण्यासाठी धड रस्तादेखील नाही. या प्रकाराकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष झाल्याने ग्रामस्थांनी दखल घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

लाईट कनेक्शनची मागणी
रात्री शौचालयात प्रकाशाची व्यवस्था करण्यात आलेली नसल्याने या संदर्भातही दखल घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. हगणदारी मुक्त गावाचा फलक ग्रामस्थांच्या दृष्टीस पडू नये म्हणून स्टेशन रस्त्यावरील बंद पडलेल्या जिल्हा परीषद शाळेच्या आवारात लावण्यात आला आहे. गाव हगणदरीमुक्त असलेतरी प्रत्यक्षात मात्र आजही ग्रामस्थांना उघड्यावर शौचाला जावे लागत असल्याचे ग्रामस्थांचे दुर्दैव आहे. स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन व पंचायत समिती प्रशासनाने दखल घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. हगणदारी मुक्त गाव योजनेचा फज्जा उडाला असून वरीष्ठ अधिकारी या सर्व बाबींची चौकशी करून कारवाई करतील का? याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !