क्रिकेट स्पर्धेमध्ये भुसावळ टीचर्स क्लबची विजयी सुरुवात


भुसावळ : शिक्षण विभागातील अधिकारी, शिक्षक व कर्मचार्‍यांसाठी एडीआय इलेव्हन क्रिकेट क्लबतर्फे आयोजित क्रिकेट स्पर्धेमध्ये भुसावळ टीचर्स क्रिकेट क्लबने सलग दोन सामने जिंकत सेमीफायनलमध्ये आपला प्रवेश निश्चित केला. 25 रोजी जळगाव येथे झालेल्या सामन्यात भुसावळ टीचर्स क्रिकेट क्लबने व्हीएसपी जळगाव व एरंडोल टीमला पराभुत केले.

यांनी केले टीमचे नेतृत्व
भुसावळ टीमचे नेतृत्व जि.प.शिंदी शाळेचे शिक्षक समाधान जाधव करीत आहे. या टीममध्ये संतोष तायडे (जि.प.शाळा हतनुर, प्रमोद गांधेले (जि.प.शाळा खेडी), कमलेश शामकुवर (जि.प.शाळा बोहर्डी), रुपेश ऊमेश्राम (जि.प.शाळा जाटगाव), प्रवीण मोरे (जि.प.शाळा, मुसाळतांडा), रीजवान खान (जि.प.शाळा, कुर्‍हेपानाचे) रामकृष्ण इतवारे (भागीरथी प्राथमिक शाळा, भुसावळ), किशोर महालपुरे, चेतन शर्मा, आनंद पाटील, अमित चौधरी (र.नं.मेहता शाळा, भुसावळ), ललित फेगडे (सर्वोदय हायस्कूल), शैलेश पाटील (डाएट), सुनील जाधव (जिजामाता प्राथमिक भुसावळ) हे खेळत आहे. यावेळी शिक्षण विभागाचे अधिकारी विजय पवार, खलील शेख, रवीकिरण बिर्‍हाडे, डाएटचे अधिव्याख्याता शैलेश पाटील, भुसावळचे गटशिक्षणाधिकारी तुषार प्रधान यांच्यासह खाजगी प्राथमिक शिक्षक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !