यावलच्या मधुर संस्कार केंद्रातर्फे मातृशक्तीचा गौरव


यावल : एखादे कार्य सुरू केल्यानंतर त्याचे सातत्य टिकणे हिच खरी यशस्वीता असते त्याबाबतीत मधुर संस्कार केंद्र भाग्यशाली असल्याचे प्रतिपादन पद्मश्री प्रा.डॉ.एम.नटराजन यांनी केले. ते वडाळा मुंबई येथे यावलच्या मधुर संस्कार केंद्राच्या मातृवंदना कार्यक्रमात बोलत होते. कोरोना विषाणुच्या पार्श्वभुमीवर यंदाच्या कार्यक्रम हा प्रातिनिधीक स्वरूपात घेण्यात आला.

यंदा उपक्रमाचे 18 वे वर्ष
मधुर संस्कार संस्थेचे अध्यक्ष कै.पी.आर.पाटील हे वयाच्या अडीच वर्षांचे असतांना त्यांचे मातृछत्र हरपले होते व ते आईच्या वात्सल्याच्या शोधात असतांना त्यांच्या नजरेस अनेक ज्वलंतर उदाहरण समोर आल्यानंतर यातूनच प्रेरीत होवून मधुर संस्कार केंद्रातुन मातृवंदना या उपक्रमाची सुरवात झाली. पू.साने गुरुजींच्या जयंतीचे औचित्य साधून दरवर्षी 24 डिसेंबरला मातृवंदना कार्यक्रमात मातृप्रेमाचा सन्मान व्हावा, मातृशक्तीचे दर्शन व्हावे म्हणून मातांचा सत्कार सोहळा आयोजित केला जातो. यावर्षी डिसेंबर 2020 मातृवंदना कार्यक्रमाचे 18 वे वर्ष वैश्‍विक संकट असतांनादेखील प.पू.महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाने प्रातिनिधीक स्वरुवात वडाळा मुंबईत झाला. या कार्यक्रमात पद्मश्री प्रा.डॉ.एम. नटराजन यांनी हितगूज साधत त्यांनी आईची महंती व आपल्या आजीचे विविध अनुभव सांगितले तसेच मधुर संस्कार केंद्र, यावल हे वडिलांनी सुरू केलेले कार्य त्यांची मुलगी प्रा.मधुराणी शिंदे यांनी त्यांच्या पश्चात सुरू ठेवुन आजच्या युवा पिढीसमोर एक आदर्श ठेवले आहे. या कार्यक्रमात पद्मश्री प्रा.डॉ.एस.नटराजन यांच्या आजी स्व.सुवर्णथामल शेनबागारामन ज्यांचे काही दिवसांपूर्वीच वयाच्या 103 व्या वर्षी निधन झाले तेव्हा त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांच्या पश्चात त्यांच्या नातु प्रा.एस.नटराजन यांना सन्मानीत करीत पुरस्कार प्रदान करण्यात आला. सुनिता वशिष्ठ (ठाणे) तसेच वैभव संपन्नता असताना एका मुलीचे पालकत्व स्विकारुन समाजासमोर आदर्श निर्माण करणार्‍या प्राजक्ता वैभव चिपळुणकर (ठाणे) यांचाही गौरव करण्यात आला. हा संपूर्ण कार्यक्रम मधुर संस्कार केंद्र व परीवाराच्या सहकार्याने संचालिका प्रा.मधुराणी शिंदे यांनी आयोजित केला.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !