प्रेमाच्या आमिषाने तरुणाला बोलावत केली लूट : एकास अटक


यावल : बुलडाणा जिल्ह्यातील रायपूर येथील एका 22 वर्षीय तरुणाला महिला व तिच्या दोन साथीदारांनी बेदम मारहाण करुन त्याच्याकडून मोबाईल व पैसे काढून घेतल्याची घटना 20 डिसेंबर रोजी सैलानी दर्गा परीसरात घडली होती. या प्रकरणातील एका संशयीतास यावल पोलिसांनी किनगाव येथुन ताब्यात घेत बुलडाणा पोलिसांच्या स्वाधीन केले. शाकीरशहा उर्फ मस्तानशहा (किनगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. बुलडाणा जिल्ह्यातील रायपूर येथील राजू तायडे याच्या तक्रारीनुसार त्यास अकिलाबी मुजानखाँ (रा.धामनगाव बढे) या महिलेने प्रेमाचे अमिष दाखवून 20 डिसेंबर रोजी सैलानी दर्गा येथे बोलावले होते. त्याला सैलानी परीसरातील जंगलातील टेकडीवर नेवून अकिलाबी व शाकीरशहा उर्फ मस्तानशहा (रा.किनगाव) व शे.अजिम शे.रहिम (औरंगाबाद ह.मु.सैलानी) या तिघांनी बेदम मारहाण करीत त्याच्याकडून चार हजार रुपये रोखे व ओप्पो कंपनीचा मोबाईल हिसकावत पोबारा केला होता. या प्रकरणी 23 डिसेंबर रोजी रायपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. यावल पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक जितेंद्र खैरणार, हवालदार सुनील तायडे यांनी शाकीरशहा उर्फ मस्तानशहा याच्या किनगाव येथून मुसक्या आवळत त्यास बुलढाणा पोलिसांच्या ताब्यात दिले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !