सांगवी खुर्दला माजी सरपंचावर मद्याच्या नशेत चाकूहल्ला


यावल : तालुक्यातील सांगवी खुर्द येथे माजी सरपंचावर एकाने दारूच्या नशेत चाकूने हल्ला केल्याने खळबळ उडाली. ही घटना रविवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास घडली. यावल पोलीसात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सांगली खुर्दचे माजी सरपंच हिरामण काशिनाथ पाटील (68) यांच्या फिर्यादीनुसार रविवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास ते गावातील अनिल न्हावी यांच्या दुकानासमोर बसले असताना संशयीत सुनील संतोष कोळी याने मद्याच्या नशेत कारण नसताना शिविगाळ केली व याचा जाब विचारल्यानंतर त्याने खिशातून चाकू काढून पाटील यांच्यावर हल्ला चढवला. यावल पोलीस ठाण्यात यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयीत सुनील कोळी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहायक फौजदार कैलास चव्हाण करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !