अट्रावलच्या स्कूल बस चालकाची नैराश्यातून आत्महत्या


यावल : तालुक्यातील अट्रावल येथील 26 वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. सचिन अशोक बाऊस्कर (26) असे मयताचे नाव आहे. सचिन हा पुणयात एका स्कूल बसवर चालक म्हणून कार्यरत होता मात्र कोरोनात रोजगाराअभावी तो गावी परतला मात्र नैराश्य आल्याने त्याने राहत्या घरी आत्महत्या केली. सोमवारी त्याच्या मृतदेहावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. कोरोना काळात शाळा बंद असल्याने रोजगाराअभावी सचिन गावी परतला होता व गावात मिळेल ते हात मजुरीचे काम करून तो आपला उदरनिर्वाह करत होता मात्र गेल्या काही दिवसांपासून तो हताश झाल्यानंतर त्याने वैफल्यग्रस्त अवस्थेत राहत्या घरी एकटा असताना आत्महत्या केली. भाऊ मिलिंद बाऊस्कर हे त्याच्या घरी गेले असता ही घटना उघडकीस आली. मृतदेहाचे यावल ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. मिलिंद बाऊस्कर यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयत तरुणाच्या पश्चात आई-वडील, पत्नी व एक तीन वर्षाची मुलगी असा परीवार आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !