जबरी चोरीतील पसार आरोपी दिड वर्षानंतर जाळ्यात
भुसावळ : जबरी चोरीच्या गुन्ह्यात पसार असलेल्या आरोपीच्या एक वर्ष चार महिन्यानंतर मुसक्या आवळण्यात बाजारपेठ पोलिसांना यश आले आहे. तुषार भास्करराव सुरे उर्फ छोटू आण्णा (31, रा.गांधी नगर, भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. आरोपीविरुद्ध जबरी चोरीचा 2 ऑगस्ट 2019 रोजी गुन्हा दाखल होता मात्र तो पोलिसांना मिळून येत नव्हता. आरोपी घरी आल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यास अटक करण्यात आली. ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अपर पोलिस अधीक्षकचंद्रकांत गवळी, चाळीसगाव विभागाचे अपर पोलिस अधीक्षकसचिन गोरे, पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत, प्रभारी निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.फौजदार अनिल अडकमोल, नाईक रमण सुरळकर, उमाकांत पाटील, विकास सातदिवे, कृष्णा देशमुख, ईश्वर भालेराव, प्रशांत परदेशी, चेतन ढाकणे आदींच्या पथकाने केली. तपास सहा.फौजदार अनिल अडकमोल करीत आहेत.

