जळगाव जिल्ह्यात कोरोनाचे 23 रुग्ण आढळले
जिल्ह्यातील बाधीतांची संख्या पोहोचली 55 हजार 677 वर : एकाच दिवसात 29 रुग्णांची कोरोनावर मात : 24 तासात तीन रुग्णांचा मृत्यू
जळगाव : जिल्ह्यात सोमवारी कोरोनाचे 23 रुग्ण आढळले असून त्याबाबत प्रशासनाला सायंकाळी अहवाल प्राप्त झाला आहे तर आतापर्यंत कोरोनामुळे 1323 रुग्णांचा मृत्यू ओढवला तर गेल्या 24 तासात तीन रुग्णांचा मृत्यू वाढल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 55 हजार 677 नागरीकांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील 53 हजार 948 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे तर सोमवारी एकाच दिवसात 29 रुग्णांनी कोरोनावर मात केली.
सोमवारी या शहरात आढळले बाधीत
जळगाव शहर 05
जळगाव ग्रामीण 06
भुसावळ 06
अमळनेर 00
चोपडा 01
पाचोरा 00
भडगाव 01
धरणगाव 01
यावल 00
एरंडोल 01
जामनेर 01
रावेर 00
पारोळा 00
चाळीसगाव 00
मुक्ताईनगर 00
बोदवड 00
अन्य जिल्हा 01

24 तासात तीन रुग्णांचा मृत्यू
गेल्या 24 तासात तीन कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे. डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय रुग्णालय महाविद्यालय, समर्थ हॉस्पीटल, चाळीसगाव व संजीवन हॉस्पीट, जळगाव येथे रुग्णांचा मृत्यू ओढवल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. मयतांमध्ये चाळीसगाव तालुक्यातील 63 वर्षीय पुरूषासह भुसावळ तालुक्यातील 70 वर्षीय पुरूष व रावेर तालुक्यातील 72 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे.

