दुचाकी चोरटा बाजारपेठ पोलिसांच्या जाळ्यात
भुसावळ : दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात पसार असलेल्या तिसर्या आरोपीच्या बाजारपेठ पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. कलीम उर्फ बाबा करीम पटेल (23 रा.एमआयडीसी, सुप्रीम कॉलनी, जळगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. 30 ऑक्टोबर 2020 रोजी तक्रारदार नामदेव प्रकाश गायकवाड (सुहास नगर) यांची दुचाकी (एम.एच.19 वाय.4604) चोरीला गेली होती. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली होती तर बाबा पटेल हा संशयीत पसार होता. आरोपीला एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सुप्रीम कॉलनी भागातून अटक करण्यात आली.
यांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या
ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, अपर पोलिस अधीक्षक सचिन गोरे, उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाघचौरे, बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत, प्रभारी निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली नाईक रमण सुरळकर, उमाकांत पाटील, विकास सातदिवे, कृष्णा देशमुख, ईश्वर भालेराव, प्रशांत परदेशी तसेच जळगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याचे एएसआय आनंदसिंग पाटील आदींच्या पथकाने केली. तपास नाईक रमण सुरळकर करीत आहेत.


