सावखेडासीम ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी निलंबीत


यावल : तालुक्यातील सावखेडासीम ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी यांना बेशिस्त वागणुकीमुळे निलंबित करण्यात आले असून किनगावचे ग्रामविकास अधिकारी यांना कारणे दाखवा नोटीस यावलचे गटविकास अधिकारी डॉ.निलेश पाटील यांनी बजावल्यानंतर पंचायत समितीच्या वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

शासकीय कामात दिरंगाई केल्याने कारवाई
यावल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ.निलेश पाटील यांनी या संदर्भात दिलेली माहिती अशी की, यावल तालुक्यातील सावखेडासीम ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी मकरंद सैदाणे यांना वारंवार सूचना करूनदेखील बैठकीस उपस्थित न राहणे, शासकीय कामात दिरंगाई करणे आदी कारणांमुळे निलंबीत करण्यात आले आहे. किनगाव ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी कृष्णकांत सपकाळे यांनादेखील याच कारणावरून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली. गटविकास अधिकारी डॉ.निलेश पाटील यांनी केलेल्या कार्यवाहीमुळे पंचायत समितीच्या वर्तुळात सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, यावल तालुक्यात झालेल्या रोजगार हमी योजनतील भ्रष्टाचार , 14 व्या वित्तीय आयोगाच्या निधीत झालेले निकृष्ठ कामांचा गोंधळ व गोठ्यांच्या बोगस लाभार्थी प्रकरणी देखील अशाच प्रकारची निष्पक्ष कार्यवाही करावी, अशी मागणी तालुक्यातून होत आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !