सावद्यात दत्त जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम


सावदा : शहरात 29 रोजी दत्त जयंतीनिमित्त विविध मंदिरात धार्मिक वातावरणात कोरोनाचे पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे करून जयंती साजरी करण्यात आली. सोमवारगिरी मढीवरील दत्त मंदिरात सकाळी दत्त याग आदी धार्मिक कार्यक्रम झाले. सायंकाळी दत्त जन्मोत्सव झाला. सोशल डिस्टन्स राखत भाविकांनी दर्शन घेतले. शहरातील गचके यांचे दत्त मंदिर येथेदेखील भक्तिमय वातवरणात धार्मिक कार्यक्रम झाले तसेच स्वामी समर्थ केंद्रात 7 दिवसापासून सुरू असलेल्या सामूहिक गुरुचरित्र पारायणाची सांगता झाली. यावेळी धार्मिक कार्यक्रम झाले. शहरातील इतर मंदिरातदेखील विविध धार्मिक कार्यक्रमांनी दत्त जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !