ग्रामपंचायत निवडणूक : भुसावळ तालुक्यात 288 अर्ज दाखल


भुसावळ : तालुक्यातील 26 ग्रामपंचायतींंसाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी मंगळवारी सायंकाळी सहापर्यंत नामनिर्देशन प्रक्रिया सुरू होती. मंगळवारी 26 पैकी 6 ग्रामपंचायतींसाठी 288 अर्ज दाखल झाले तर एकूण अर्जांची संख्या 331 झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. मंगळवारी सकाळपासून तहसील कार्यालयाच्या आवारात उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी गर्दी केली. अर्जासाठी दुपारी तीन वाजेपर्यंत मुदत होती. या मुदतीनंतर येणार्‍या उमेदवारांना बुधवारी अर्ज दाखल करण्याची सूचना देण्यात आली. तहसीलदार दीपक धिवरे, निवडणूक नायब तहसीलदार संजय तायडे यांनी नामनिर्देशन प्रक्रियेची माहिती घेतली. अर्ज प्रक्रियेदरम्यान अनेकदा सर्व्हर डाऊन झाल्याने प्रक्रियेला विलंब झाला. तहसीलसोबतच शहरातील सायबर कॅफेवरदेखील गर्दी कायम होती.

दाखल अर्ज असे
कुर्‍हे पानाचे 15, काहूरखेडा 12, खंडाळे 4, किन्ही 16, कंडारी 32, फेकरी 14, पिंपळगाव बुद्रूक 2, जोगलखेडा-भानखेडा 13, साकेगाव 34, साकरी 18, टहाकळी 6, जाडगाव 4, बोहर्डी बुद्रूक 4, सुसरी 6, बेलव्हाय 7, पिंप्रीसेकम 25, हतनूर 6, वांजोळे-मीरगव्हाण 2, शिंदी 11, खडके 36, मांडवेदिगर 4, दर्यापूर 17





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !