खडका येथून दुचाकी लंपास, शिवारातही चोरीचे प्रकार वाढले
खडका : खडका गावासह परीसरात गेल्या आठवड्यात भुरट्या चोर्या वाढल्या आहेत. गेल्या चार दिवसांत गावातून दोन दुचाकींची चोरी झाली असून शेतांमध्ये केबल, ठिबक चोरीचे प्रकार वाढले आहे. खडका येथील रामचंद्र बडगुजर यांची घराबाहेर लावलेली दुचाकी (क्र.एम.एच.19-ए.एस.1423) सोमवारी घराबाहेरून चोरट्यांनी लांबवली. याप्रकरणी पोलिसात तक्रार दिलेली नाही. अनेक शेतकर्यांच्या केबल, ठिबक संच, कटआऊट, स्विचबॉक्स असे साहित्य चोरीला गेले आहे. तर कपाशीदेखील लंपास केली आहे.

