भुसावळात सट्ट्यावर धाड : ८१ हजारांचा मुद्देमाल जप्त


भुसावळ : शहरातील पाणी गेट जवळ रीक्षात बसून सट्याचे आकडे लिहीत असलेल्या एका सटाेडीवर पाेलिसांनी छापा टाकत त्याच्याकडून ४६ हजार ९७०
रूपये राेख, एक रीक्षा, दाेन माेबाईल आदी मिळून ८१ हजार ७० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई गुरुवारी दुपारी ३.५० वाजता करण्यात आल्यानंतर भुसावळातील अवैध धंदे चालकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

गोपनीय माहितीवरून पोलिसांनी केली कारवाई
पाणी गेटजवळ रीक्षात एक जण सट्टाचे आकडे लिहीत असल्याची माहितीपाेलिसांना मिळाल्याने संजय बडगुजर यांनी इजाज माेहंमद रसीद माेहंमद (रा.मुस्लीम काॅलनी, भुसावळ) यास गुरूवारी दुपारी ३.५० वाजता अटक केली,
त्याच्या ताब्यातून सट्याचे आकडे, पावती पुस्तक, रीक्षा, दाेन माेबाईल आदी मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी इजाज याच्याविरूध्द शहर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !