भुसावळात पाेलिस अधिकाऱ्यांकडून मतदान केद्रांची पाहणी
भुसावळ : ग्रामपंचायत निवडणूकांच्या पार्श्वभुमीवर पाेलिस प्रशासनाकडून मतदान केद्रांची पाहणी शनिवारी करण्यात आली. मतदान केद्रांची संरक्षणभिंत, सीसीटिव्ही कॅमेरे आहे का, मतदान केद्रात हवा खेळती आहे का, याची पाहणी करून महसूल विभागाला अहवाल सादर केला जाणार आहे. तालुक्यातील २६ ग्राम पंचायतीच्या पंचवार्षिक निवडणूका हाेत असून उमेदवारी दाखल करण्याची प्रक्रीया पार पडली आहे. त्यामुळे पाेलिस प्रशासनाकडून मतदान केद्रांची पहाणी करण्यात आली.
यांनी केली पाहणी
डीवायएसपी साेमनाथ वाघचाैरे, पाेलिस निरीक्षक बाबासाहेब ठाेंबे, निरीक्षक रामकृष्ण कुंभार
यांच्यासह गाेपनिय विभागातील कर्मचारी यांनी शनिवारी कंडारी, फेकरी, दीपनगर, निंभाेरा येथील मतदान केद्रांची पहाणी केली. या मतदान केद्रांना वाॅल कंपाउंड आहे, का, कुठल्या मतदान केद्राच्या परीसरात सीसीटिव्ही
कॅमेेरे लावले आहे का नाही, मतदान केद्रात उजेड येताे का, सुरक्षेच्या दृष्टीने मतदान केद्रे याेग्य अाहे का, याची पहाणी करण्यात आली. उर्वरित मतदान केद्रांची पहाणी येत्या दाेन दिवसात पूणॅ केली जाणार आहे, असे
डीवायएसपी वाघचाैरे म्हणाले.


