एलटीटी-गाेरखपूर एक्स्प्रेसमध्ये दराेडा
सात प्रवाशांचे राेख रक्कमेसह माेबाईल लंपास : पाच संशयीतांना पाेलिसांनी घेतले चाैकशीकामी ताब्यात
भुसावळ : गाडी (०२५४२) एलटीटी- गाेरखपूर एक्स्प्रेसच्या काेच डी – २ मध्ये प्रवास
करणाऱ्या प्रवाशांना जळगाव-भुसावळ दरम्यान गाडीतील खाद्य पदार्थ विक्री करणाऱ्या १० विक्रेत्यांनी लूटमार केल्याची घटना १ जानेवारीला सायंकाळी
६.१५ वाजता घडली. याप्रकरणी जीआरपी पाेलिस ठाण्यात १० जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाेलिसांनी या प्रकरणी पाच जणांना
चाैकशीकामी ताब्यात घेतले आहे. या प्रकारामुळे प्रवासी वर्गात खळबळ उडाली आहे. एलटीटी-गाेरखपूर एक्स्प्रेस ही गाडी नाशिकराेड स्थानकावर हळू झाल्यावर काेच डी-२ मध्ये काही विक्रेते चढले त्यांनी दारू पिली असून गांजा सेवन केला हाेता, अश्यातच ते खाद्य पदार्थ, खेळणीची विक्री करीत हाेते. गाडीने जळगाव स्थानक साेडल्यावर या विक्रेत्यांनी प्रवाशांना पैश्यांची मागणी
करून त्यांना मारहाण करून त्यांचे जवळील राेख रक्कम आणि माेबाईल जबरीने हिसकावून भुसावळ रेल्वे स्थानक येण्यापूर्वीच दहा मिनीटे अगाेदर गाडी हळू झाल्यावर आऊटरला उतरून पळ काढला. याप्रकरणी प्रवाशांनी इटारसी येथे गुन्हा दाखल केल्यावर तेथून शून्य क्रमांकाने गुन्हा भुसावळ जीआरपी पाेलिस ठाण्यात शनिवारी आल्यावर दाखल करण्यात आला.
विक्रेत्यांचा धूडगूस
विशेष रेल्वे गाड्या सुरू झाल्या असून या गाड्यामध्ये अवैधरित्या खाद्य पदार्थ विक्री करणाऱ्यांची दादागिरी वाढली आहे. याचमुळे नाशिक येथूनगाडीत बसलेल्या या १० विक्रेत्यांनी या गाडीतील डी २ या डब्यातील
प्रवाशांना लूटमार केली. हे प्रवासी अगाेदर खाद्य पदार्थ विक्री करीत हाेते, मात्र जळगाव स्थानक साेडल्यावर यांनी शिवीगाळ करीत जबरीने प्रवाशांच्याजवळील राेख रक्कम आणि माेबाईल हिसकाविण्यास सुरूवात केली.
भुसावळ जंक्शन येण्यापूर्वीच दहाही विक्रेत्यांनी पलायन केले.

यांची झाली लूट : एलटीटी गाेरखपूर एक्स्प्रेसमधून प्रवास करणारे प्रवासी तथा फिर्यादी राजकुमार अरविंदकुमार यांचे पाच हजार राेख, शिवभाेला यांचे ३०० रूपये राेख व एम ७ हजार ५०० रूपये किमतीचा माेबाईल, हनुमान प्रसाद यांचे १ हजार ५०० रूपये राेख व १० हजार रूपयांचा माेबाईल, चेतन शर्मा यांचे एक हजार रूपये राेख व पाच हजार रूपयांचा एक माेबाईल, माेहंमद इजहार यांचे ७००
रूपये राेख व सात हजाराचा माेबाईल, नसुरूद्दिन यांचे २ हजार ५०० रूपये राेख, हसिम यांचे मनगटी घड्याळ दाेन हजार रूपये किंमतीचे, राम माेहन यादव
यांचे ३ हजार १०० रूपये राेख, अाधार कार्ड, पॅन काडॅ, वाहन चालविण्याचा परवाना असा एकुण ४८ हजार ८०० रूपये कींमतीचा माल लांबविला.
दरोड्याचा गुन्हा दाखल
इटारसी येथून भुसावळ जीआरपी पाेलिस ठाण्यात मेलद्वारे आलेल्या फिर्यादीवरून पाेलिसांनी दराेड्याचा गुन्हा दाखल केला आहे. पाेलिस निरीक्षक सुरेश सरडे, सहा. पाेलिस निरीक्षक परमेश्वर साेगे यांनी घटनास्थळी भेट दिली. राजकुमार अरविंदकुमार (रा. करमिया पाेस्टे परसरान, जि. बस्ती, उत्तर प्रदेश) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दराेड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाच संशयीतांच्या आवळल्या मुसक्या
जीआरपी पाेलिस ठाण्याचे निरीक्षक सुरेश सरडे यांच्या मार्गदर्शनाखाली पाेलिस अधिकारी व कर्मचारी यांनी भुसावळ शहरातील वेगवेगळ्या ठीकाणाहून
पाच जणांच्या मुसक्या आवळल्या असून त्यांची कसून चाैकशी पाेलिसांकडून केली जात आहे. दराेड्यात काेण काेण हाेते, याची माहिती काढण्याचे काम
सुरू आहे. संशयीतांनी जीआरपी पाेलिस ठाण्यात गाेंधळ केल्याने बाजारपेठ पाेलिस ठाण्याचे निरीक्षक दिलीप भागवत व त्यांच्या सहकाऱ्यांनी तत्काळ रेल्वे स्थानक परिसर व जीआरपी पोलिस ठाणे गाठून माहिती घेत बाजारपेठ पाेलिस ठाण्याच्या हद्दित राहणाऱ्या गुन्हेगारांची माहिती काढण्याच्या सूचना पाेलिसांना दिल्यात.
पाेलिस निरीक्षकांचे पथक रवाना
जीआरपी पाेलिस ठाण्याचे निरीक्षक सुरेश सरडे व त्यांच्या सहकाऱ्यांचे एक पथक अन्य संशयीताच्या शाेधासाठी रवाना झाले आहे. त्या पथकाला अजून काेण-काेण संशयीत सापडात याकडे लक्ष लागले आहे. याप्रकरणी निरीक्षक सुरेश सरडे पुढील तपास करीत आहे.

