भोकरी फाट्यावर अपघात : वखारीची महिला ठार


रावेर : तालुक्यातील भोकरी फाट्यावर रविवारी दुपारी ट्रकने मोटारसायकलला धडक दिल्याने झालेल्या अपघातात ३८ वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रावेर-बऱ्हाणपूर रस्त्यावर भोकरी फाट्यावर दुपारी पावणे दोन वाजता घडली. मंगलाबाई सोपान शिरसाठ (३८, रा.वखारी ता.जि.बऱ्हाणपूर) असे अपघातात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. या अपघातात महिलेचा पती गंभीर जखमी झाला आहे.

पत्नीचा जागीच मृत्यू : पती गंभीर जखमी
वखारी येथील रहिवासी असलेले सोपान कडू शिरसाठ हे पत्नी मंगलाबाईसह केऱ्हाळा खुर्द येथील मंगलाबाईच्या आजीची तब्येत खराब असल्याने भेट घेण्यासाठी शनिवारी आले होते. ते दुपारी दीड वाजता ते वखारी येथे मोटारसायकल क्रमांक (एम पी.१२.एच.डी.९१५८) ने जात असताना रावेरकडून बऱ्हाणपूरकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या कंटेनर क्रमांक (एम.पी. ०७ एच.बी.३३७१) ने जोरदार धडक दिल्याने मंगलाबाई यांचा जागीच मृत्यू झाला तर पती सोपान शिरसाठ हे या अपघातात गंभीर जखमी झाले. त्यांना पुढील उपचारासाठी बऱ्हाणपूर येथे हलविण्यात आले आहे. याबाबत येथील पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. चालक रामप्रसाद जगडीशसिंग यादव (गोरमी, ता.मेहेगाव, जि.भिंड, मध्यप्रदेश) याला पोलिसांनी अटक केली आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !