बोदवडला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन
बोदवड : समस्त जिजाऊच्या लेकींनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली. यावेळी रंजना कोळी यांनी आपल्या मनोगतात क्रांतीज्योती सावित्रीमाई जोतीराव फुले या भारतीय पहिल्या शिक्षिका, पहिल्या मुख्याध्यापिका व महान समाजसेविका आहे. शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील त्यांचे कार्य महान आहे, त्याचबरोबर साहित्यिक क्षेत्रातील त्यांचे योगदानही महत्त्वपूर्ण आहे. त्यांच्या काव्यातून त्यांचे विशाल, प्रतिभासंपन्न व लोककल्याणकारी व्यक्तिमत्व दिसून येते. सावित्रीमाईंच्या गद्य- पद्य रचना या शूद्रातिशुद्र समाजाने शिक्षण घ्यावे व समाजात जाणीव जागृती निर्माण करून त्यांचे कल्याण व्हावे या हेतूने केलेली महान साधना होय, असे कोळी म्हणाल्या तसेच मनीषा सटाले, संगीता देवकर चिमुकल्या आकांक्षा पालवे, निधी हिवराळे, गायत्री शिगोटे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे आयोजन रेखा ढोले, जिजाऊ ब्रिगेड जिल्हा कार्याध्यक्षा प्रियंका पाटील यांनी केले. यावेळी संगीता मराठे, सुनीता पालवे, प्रगीता पाडर, निर्मला वाघ, मंगला सोनवणे, मीना बरकले, अनिता पाटील, मंदा शिगोटे, सुवर्णा चौधरी, प्रमिला यादव, दीपाली सोनवणे, ज्योती चौधरी, संगीता पाडर, अश्विनी चौधरी, महाजन, सुशीला पाटील, अलका हिवराळे, ज्योती मराठे, दीपाली पाटील, सायली काकडे, वैशाली वानखेडे , राणी बावस्कर, गायत्री मराठे आदी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सूत्रसंचालन अनिता पाटील यांनी केले. पंचक्रोशीतील शिक्षिका यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी महिला शिक्षिका रंजना कोळी-इंगळे, मनिषा सटाले, देवकर, सुरेखा घुले, विद्या वाघ, जयश्री अळसड यांचा सत्कार जिजाऊ चरीत्र, संभाजी राजे चरीत्र व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला.

