भुसावळात अल्पवयीन बालकावर अनैसर्गिक कृत्य
भुसावळ : शहरातील गौसियानगर भागात अल्पवयीन बालकावर अनैसर्गिक कृत्य केल्याप्रकरणी आरोपी शेख नईम शेख समदविरुद्ध बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला यासून आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्या 7 जाने वारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. संशयीत आरोपीने ३ रोजी सायंकाळी ५.४५ वाजेच्या सुमारास फिर्यादी यांच्या मुलास घरात बोलावून अनैसर्गिक कृत्य केल्याचा आरोप आहे. आरोपीविरुद्ध भादवि कलम ३७७,३४१ बालकांचे लैगिंक अपराधापासून संरक्षण अधिनियमाचे कलम ४,६ प्रमाणे बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे व पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.निरीक्षक मंगेश गोंटला करीत आहेत.

