मुक्ताईनगरात दोन हजारांचा नायलॉन मांजा जप्त


मुक्ताईनगर : शहरातील पूनम कलेक्शनमध्येे मुक्ताईनगर पोलिसांनी छापा टाकत पतंगासह एक हजार 920 रुपये किंमतीचा मांजा जप्त करण्यात आला. या प्रकरणी गोपीचंद सोनवणे यांच्या फिर्यादीनुसार मुक्ताईनगरातील पूनम कलेक्शनमधून प्लास्टिक कागदाचे पतंग व मांजाच्या 50 चकर्‍या, 360 रुपये किंमतीचा मांजा, 200 रुपयांच्या लहान चकर्‍या असा एकूण एक हजार 920 रुपये किंमतीचा माल जप्त करण्यात आला. पोलिस निरीक्षक सुरेश शिंदे, पोलिस उपनिरीक्षक कैलास भारसके, पोलिस उपनिरीक्षक नीलेश सोळुंके, सहा.फौजदार सादीक पटवे, देवेंद्र काटे यांनी ही कारवाई केली. तपास सहा.पोलिस निरीक्षक सादीक पटवे करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !