फैजपूर पालिका विषय समिती सदस्य निवड बिनविरोध


फैजपूर : पालिकेच्या विविध विषय समिती सदस्य निवडीसाठी मंगळवारी विशेष ऑनलाईन सभेचे आयोजन करण्यात आले. पीठासीन अधिकारी म्हणून तहसीलदार (कुळकायदा शाखा) जळगाव महेंद्र माळी होते. नगराध्यक्षा महानंदा होले, उपनगराध्यक्ष नयना चौधरी व मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांच्या उपस्थितीत ही सभा झाली. या ऑनलाइन सभेला नगरसेवक अमोल निंबाळे व नगरसेविका पुष्पा कापडे गैरहजर राहिले. सभेसाठी वरीष्ठ लिपिक दिलीप वाघमारे प्रसन्न डोलारे संगीता वाक्षे यांनी कामकाज पाहिले.

विषय समिती सदस्य असे-
सार्वजनिक बांधकाम समिती- शेख कुर्शन शेख करीम, मिलिंद शंकर वाघुळदे, वत्सला रघुनाथ कुंभार, देवेंद्र मोतीराम बेंडाळे, पाणीपुरवठा व जलनिस्सारण समिती- फातेमा रईस मोमीन, हेमराज खुशाल चौधरी, देवेंद्र इच्छाराम साळी, नयना चंद्रशेखर चौधरी, नियोजन व विकास समिती- रशीद नशीर तडवी, प्रभाकर पुंडलिक सपकाळे, केतन डिगंबर किरंगे, ननिसायी शेख इरफान, महिला व बालकल्याण समिती- अमिता हेमराज चौधरी, साईमा बी मलक आबीद, शाहीन परवीन शकील खान, नफीसाबी शेख इरफान, पुष्पा मनोज कापडे, स्वच्छता विषयक वैद्यकीय व सार्वजनिक आरोग्य समिती- हेमराज खुशाल चौधरी, शकुंतला मोतीराम भारंबे, कलीम खा हैदर खा, शाहीन परवीन शकील खान





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !