सावद्यात फळांचा ट्रक उलटल्याने क्लिनरचा मृत्यू : चालक जखमी
सावदा : अंकलेश्वर-बर्हाणपूर महामार्गावर 4 रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास रावेरकडून सावद्यामार्गे येणारा भरधाव ट्रक गॅस गोदामासमोर उलटल्याने या घटनेत ट्रक क्लिनर ठार झाला तर चालक जखमी झाला. या अपघातात मालाचे व ट्रकचे नुकसान झाल्याने सावदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
भरधाव ट्रक उलटला
रावेरकडून सावद्याकडे फळांनी भरलेला ट्रक (क्र.जे.के.08 एच.9776) भरधाव वेगात येत असताना गॅस गोदामासमोरच वळणावर जोरदार ब्रेक ट्रक मारल्याने ट्रक अचानक पलटी झाला. 4 रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात ट्रक क्लिनर मुन्ना उर्फ सोमराज रमेशचंद्र हा ठार झाला तर चालक करण राजेश शर्मा हा जखमी झाला. अपघाताची माहिती मिळताच सावद्याचे सहा.निरीक्षक डी.डी.इंगोले व पोलिसांनी धाव घेतली. जखमी चालकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले तसेच स्वतःच्या दुखापतीस तसेच मयत क्लिनरच्या मरणास व ट्रकच्या नुकसानीस भरल्याप्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.


