वाराणसी एक्स्प्रेसमधून प्रवाशाचा मोबाईल लांबवला
भुसावळ : प्रवासी झोपल्याची संधी साधून चोरट्याने 12 हजार रुपये किंमतीचा मोबाईल लांबवल्याची घटना डाऊन पुणे-वाराणशी एक्स्प्रेसमध्ये 4 रोजी घडली. राकेशकुमार पाल (रा.दर्यापूर) हे पुणे ते अलाहाबाद असा प्रवास करीत असताना गाडी मनमाडजवळ आली असता पाल यांना झोप लागल्याची संधी चोरट्याने साधली व 12 हजार रुपये किंमतीचा मोबाईल लांबवला. पाल यांनी भुसावळ लोहमार्ग पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अनोळखी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून मनमाड लोहमार्ग पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला.

