दुचाकीच्या डिक्कीतून दोन लाखांची रोकड लांबवली
अंगावर राख टाकून भामट्याने भुरळ आणत लांबवली रक्कम
शहादा : अंगावर राख टाकून भुरळ आणत भामट्याने एक लाख 95 हजारांच्या रकमेवर डल्ला मारला. शहादा शहरातील नवीन भाजी मार्केटला लागून असलेल्या युनियन बँकेच्या बाहेर ही घटना बुधवारी दुपारी दिड वाजता घडली. झाले असे की, रतीलाल सुदाम पाटील (कळमसर मोहिदा) यांनी आपल्या बचत खात्यातून एक लाख 95 हजार रुपये रोख रक्कम काढून ती दुचाकीच्या डिक्कीत ठेवली व त्याचवेळी एका आरोनी त्यांच्या अंगावर राख टाकल्याने पाटील यांना भुरळ आल्यानंतर भामट्याने रक्कम लांबवली.
कर्जाची रक्कम लांबवली
कळमसर मोहिदा येथील रतिलाल सुदाम पाटील यांना कृषी कर्ज मंजूर झाल्यानंतर त्यांनी शहादा शहरातील युनियन बँकेच्या शाखेच्या खात्यावर जमा झालेली रक्कम काढली. त्यांच्यासोबत नारायण उत्तम पाटील हेदेखील आले मात्र ते मोबाईलचा काच बदलण्यासाठी गेल्यानंतर त्याचवेळी रतिलाल पाटील हे दुचाकीजवळ उभे असताना अज्ञात भामट्याने त्यांच्या अंगावर राख टाकल्याने पाटील यांना भुरळ आली व भामट्याने रक्कम लांबवली.


