भुसावळ मंडळात 12 रोजी सामग्री प्रदर्शन
भुसावळ : मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळाद्वारा रेल्वेमध्ये उपयोगात येणार्या सामग्रीचे प्रदर्शन 12 रोजी डीआरएम कार्यालयात सकाळी 11 ते तीन दरम्यान करण्यात आले. या प्रदर्शनात रेल्वेचे विविध उपकरण व सामग्रीचे माहिती दिली जाणार आहे. अधिकृत विक्रेत्यांना काही आवश्यकता असेल तर त्याला मार्गदर्शन केले जाणार असून नवीन विक्रेत्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ही उत्पादने प्रदर्शित केली जाणार आहेत. कोरोना नियमांचे पालन करून उपस्थितीचे आवाहन करण्यात आले आहे.

