स्कायलेब डिसुझा यांनी विझवली आग
भुसावळ : कंडारी शिवारात डॉ.मनोहर गायकवाड यांच्या घरी 6 रोजी रात्री 9 वाजेच्या दरम्यान लग्न सोहळ्याची धामधून सुरू असतांना गच्चीवर स्वयंपाकाची लगबग सुरू असतानाच सिलिंडरने पेट घेतला व त्याचवेळी उपस्थित असलेले वन्यजीव संरक्षण संस्थेचे सक्रिय सदस्य तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षित व सर्पमित्र स्कायलेब डिसुझा यांनी उपलब्ध साहित्यातील कपडे ओले करून क्षणात पेटत्या सिलेंडरवर झाकत आग नियंत्रणात आणली. काही वेळातच अग्निशमन बंबदेखील आला परंतु त्यापूर्वीच आग विझली होती. त्यांना माघारी परतावे लागले स्कायलेब डिसुझा यांच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे .

