पत्रकारीता मूल्ये आणि तंत्रज्ञानावर आधारीत असावी


पत्रकारांच्या सन्मान सोहळ्यात लाईव्ह ट्रेंडचे संपादक शेखर पाटील

फैजपूर : पत्रकारीता सातत्यपूर्ण बदलणारी प्रक्रिया असून येणारा काळ पत्रकारांसाठी आव्हानात्मक असणार असून त्यासाठी प्रत्येकांनी गेलेल्या काळाला वंदन करून भविष्यकालीन आव्हाने पेलण्यासाठी टेक्नोसव्ही आणि व्हॅल्यूबेस्ड पत्रकारीतेला अंगीकारावे, असे आवाहन पत्रकारांच्या सन्मान सोहळ्यात लाईव्ह ट्रेंडचे संपादक शेखर पाटील (जळगाव) यांनी व्यक्त केले. ते सतपंथ चॅरीटेबल ट्रस्ट व सतपंथ संस्थान, वढोदा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दर्पणकार आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती प्रित्यर्थ सबंध महाराष्ट्रभर साजरा होणार्‍या पत्रकार दिनाच्या औचित्याने परिसरातील पत्रकार बाधवांच्या सन्मान सोहळ्यात बोलत होते.

यांची व्यासपीठावर उपस्थिती
अध्यक्षस्थानी सतपंथ चरीटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष महामंडलेश्वर आचार्य जनार्दन हरीजी महाराज होते. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार राजू मामा भोळे यांची उपस्थिती होती.


पत्रकारांना विमा कवच गरजेचे : आमदार भोळे
आमदार राजू मामा भोळे यांनी पत्रकारीता अत्यंत जोखमीची असून समाजातील ईष्ट व अनिष्ट घडामोडींना समाज मनापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रचंड त्रास सहन करावा लागतो. प्रसंगी यामुळे स्वतःचा आणि परीवाराचा जीवही ही धोक्यात टाकावा लागतो. अशा परीस्थितीत सर्व पत्रकार बंधूंना विमा संरक्षण कवच असणे अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे सरकार दरबारी यासाठी प्रयत्नरत राहू, असे आश्वासन आमदारांनी दिले.

स्वतःसह परीवाराची काळजी घ्या : महामंडलेश्‍वर
महामंडलेश्वर आचार्य जनार्दन हरीजी महाराज यांनी उपस्थित पत्रकार बंधूंना कर्तव्य सांभाळताना परीवाराची काळजी घ्या, स्वतः सुरक्षित राहून समाज उभारणीसाठी योगदान द्या, असे आवाहन त्यांनी केले.

यांचा झाला सन्मान
या सन्मान सोहळ्यात पत्रकार वासुदेव सरोदे, प्रा.उमाकांत पाटील, निलेश पाटील, अरुण होले, योगेश सोनवणे, नंदकिशोर अग्रवाल, समीर तडवी, फारुख शेख, डॉ.राजेंद्र तायडे, सलीम पिंजारी, मयूर मेढे, संजय सराफ, सलीम पिंजारी, राजू तडवी, इदू पिंजारी आदी पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन लेफ्ट डॉ.राजेंद्र राजपूत यांनी केले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !