भुसावळातील पु.ओ.नाहाटा महाविद्यालयाला पुस्तके भेट


भुसावळ : शहरातील प्रा.डॉ.डी.एम.ललवाणी यांनी आपल्या वृद्ध आई स्व.ताराबाई ललवाणी यांच्या वृद्धापकाळाने झालेल्या निधनानंतर आणि 33 वर्षीय तरुण उच्चशिक्षित आणि कर्तृत्ववान मुलगा स्वप्नील ललवानी यांच्या अकाली निधनानंतर शैक्षणिक, सामाजिक उपक्रमासाठी विविध प्रकारची समाजपयोगी मदत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी कथा, कादंबरी आणि शैक्षणिक पुस्तके विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी आणि अवांतर ज्ञानार्जनासाठी महाविद्यालयाच्या ग्रंथालयात प्राचार्य आणि उपप्राचार्य यांच्या उपस्थितीत एकूण 32 पुस्तके स्वच्छेने भेट दिली.

ज्ञानासह व्यक्तीमत्वात वाढ : प्राचार्य
याप्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.मीनाक्षी वायकोळे यांनी या पुस्तकांचा उपयोग महाविद्यालयाच्या विद्यार्थी, प्राध्यापकांना आपल्या ज्ञानात व व्यक्तिमत्व विकासात वाढ करण्यासाठी होईल, असे मत व्यक्त करून सदर उपक्रमाबाबत प्रा.डॉ.डी.एम.ललवाणी यांचे कौतुक केले. यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.मीनाक्षी वायकोळे, उपप्राचार्य डॉ.एस.व्ही.पाटील, उपप्राचार्य एन.ई.भंगाळे, ग्रंथपाल आशिष चौधरी व ग्रंथालयातील कर्मचारी उपस्थित होते.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !