अवकाळी पावसामुळे गव्हासह हरबरा पिकाला फटका बसण्याची भीती
भुसावळ : शहरासह तालुक्यात अवकाळी पावसाने गुरूवारी पहाटे हजेरी लावल्याने गव्हासह हरबरा पिकाला फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे. तालुक्यातील वरणगाव येथे सर्वाधिक 15 मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याचे सूत्रांनी सांगितले. गुरुवारी पहाटे 2 ते 3 वाजेच्या सुमारास पाऊसाने हजेरी लावल्याने बाहेर धान्य वाळण्यासाठी टाकलेल्या नागरीकांची धावपळ उडाली. महसूल विभागाच्या माहितीनुसार भुसावळ 0.2, वरणगाव 15, पिंपळगाव 2 तर कुर्हा येथे शून्य मि.मि.पावसाची नोंद झाली.

