23 वर्षीय तरुणीची गळफास घेवून आत्महत्या
जळगाव : तालुक्यातील भादली येथील खुशबू गोपाळ चौधरी वय 23 तरुणीने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी रोजी सकाळी 9.30 वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. भादली येथे गोपाळ प्रभाकर चौधरी हे कुटुंबासह वास्तव्यास आहेत. ते शेती करतात. 7 जानेवारी रोजी सकाळी नेहमीप्रमाणे गोपाळ चौधरी हे पत्नी विजया सोबत शेतात गेले असता घरी एकट्या असलेल्या खुशबू हिने गळफास घेतला. चौधरी यांच्या शेजारी राहणार्या तरुणाच्या हा प्रकार लक्षात आला. त्याने ग्रामस्थांना याबाबत माहिती दिली. ग्रामस्थांसह नातेवाईकांनी दरवाजा तोडून खुशबू हिस तातडीने जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. याठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ.विजय कुरकुरे यांनी तिस मृत घोषित केले. आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही.

