भुसावळ-लखनऊ दरम्यान वन वे विशेष गाडी धावणार


भुसावळ : मध्य रेल्वेतर्फे अतिरिक्त भुसावळ ते लखनऊ दरम्यान वन वे विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. डाऊन 02175 डाऊन भुसावळ ते लखनऊ सुपरफास्ट वन वे विशेष गाडी रविवार, 10 रोजी भुसावळ येथू सायंकाळी 7.50 वाजता सुटल्यानंतर दुसर्‍या दिवशी दुपारी 1.30 वाजता लखनऊ स्थानकावर पोहोचेल. या गाडीला खंडवा, ईटारसी, भोपाळ, बीना, झांसी, कानपूर स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. 9 पासून गाडीचे आरक्षण संकेतस्थळ तसेच रेल्वेच्या अ‍ॅपवर सुरू होणार असून केवळ आरक्षित व कन्फर्म तिकीट असलेल्या रेल्वे प्रवाशांना या गाडीत प्रवासाची परवानगी मिळणार आहे शिवाय प्रवाशांना कोरोना नियमांचे पालन करावे लागणार आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !