भुसावळात 19 हजार रुपये किंमतीचे पाईप लांबवले : एकाला अटक
भुसावळ : अमृत योजनेच्या कामावरील 19 हजार 200 रुपये किंमतीचे पाईप लांबवल्याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात दोघा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. मंगेश इंगळे (अशोक नगर, भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. तक्रारदार नवनाथ विठ्ठल इंगळे (अष्टभूजा डेअरीजवळ0, भुसावळ) यांच्या तक्रारीनुसार आयडीया क्रेट इन्फ्रा प्रा.लि. या कंपनीत सुपरवायझर आहेत शिवाय शहरातील सिंधी कॉलनी, कोलते फेब्रिकेशनजवळ अमृत योजनेचे काम सुरू आहे. त्या ठिकाणी संशयीत मंगेश इंगळे यांनी काम मागितले होते मात्र मजुरांची आवश्यकता नसल्याचे कारण सांगितल्याने ते माघारी परतले व 8 रोजी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास तक्रारदार इंगळे व वॉचमन दत्तू शिरसाठ हे झोपलेले असताना काहीतरी पडल्याचा आवाज झाल्याने दोघांनी उठून पाहिले असता मंगेश व त्याच्यासोबत शरीराने सडपातळ, अंगात काळा शर्ट, निळी जीन्स परीधान केलेला आरोपींनी 19 हजार 200 रुपये किंमतीचे पाईप्स लांबवल्याचे आढळून आले. या प्रकरणी तक्रारदार नवनाथ विठ्ठल इंगळे यांच्या तक्रारीनुसार दोघा आरोपींविरोधात गुन्हा दाखल असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. तपास हवालदार सुनील जोशी करीत आहेत.

