सुप्रीम कंपनीचा कर्मचारी बेपत्ता


भुसावळ : गाडेगाव, ता.जामनेर येथील सुप्रीम कंपनीतील कर्मचारी व भुसावळ येथील रहिवासी असलेला 40 वर्षीय इसम 5 रोजी कामावर जातो, असे सांगून घराबाहेर पडले मात्र अद्यापही घरी न परतल्याने त्यांच्या पत्नीने बाजारपेठ पोलिसात फिर्याद दिल्यावरून हरवल्याची नोंद करण्यात आली. रंजनाबाई भूषण पाटील (30, शिवपूर कन्हाळा, राधाकृष्ण अपार्टमेंट, भुसावळ) यांनी या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात तक्रार दिली. त्यांचे पती भूषण पाटील (40) हे जामनेर तालुक्यातील गाडेगावच्या सुप्रीम कंपनीत कामाला असून 5 रोजी दुचाकी (एम.एच.19 सी.टी.663) ने कामावर जातो, असे सांगून बाहेर पडले मात्र कंपनीत कामावर पोहोचलेच नाही. त्यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधूनही प्रतिसाद मिळत नाही शिवाय सर्वत्र शोध घेवूनही ते न आढळल्याने बाजारपेठ पोलिसात रंजनाबाई पाटील यांच्या फिर्यादीनुसार हरवल्याची नोंद करण्यात आली. तपास पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक रमण सुरळकर करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !