अपूर्ण घरकुले असणार्‍या लाभार्थींच्या समस्या सोडवा


गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल : घरकुल संदर्भात घेतली ग्रामसेवकांची आढावा बैठक

रावेर : रावेर तालुक्यातील प्रलंबित घरकुल असणार्‍या लाभार्थींच्या घरा पर्यंतजाऊन त्यांच्या समस्या सोडवा, त्यांना येणार्‍या अडचणी जागेवर सोडवून अपूर्ण घरकुले पूर्ण करण्याच्या सूचना ग्रामसेवकांना देण्यात आल्या तसेच तालुक्यातील घरकुल लाभार्थींनी शासनाला सहकार्य करून आपले स्वत:चे घरकुल पूर्ण करण्याचे आवाहन गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल यांनी केले आहे.

यांच्या उपस्थितीत झाली बैठक
रावेर पंचायत समितीमध्ये अपूर्ण घरकुल संदर्भात महत्वाची बैठक झाली. यावेळी गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल यांनी महाआवास अभियान जलजीवन मिशन, 15 व्या वित्त आयोग, 14 वा वित्त आयोग, ग्रामपंचायत कर वसुली, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना संदर्भात पंचायत समितीमध्ये तालुक्यातील ग्रामसेवकांचे आढावा घेण्यात आला. यावेळी विस्तार अधिकारी डी.एस.सोनवणे, दीपक संदानशीव, शशिकांत सपकाळे, जाधव आदी उपस्थित होते.


यांची होती उपस्थिती
रावेर पंचायत समितीच्या आढावा बैठकीला ग्रामसेवक दीपक कोसोदे, उद्धव चौधरी, आर.के.चौधरी, डी.सी.पाटील, मनोहर चौधरी, एम.डी.पाटील, अनिल वराडे, छाया नेमाडे, विद्या धांडे, अफरीन तडवी, कपिला गावीत, सुनील सवर्णे, राहुल लोखंडे, ए.डी.पाटील, दीपक कोळी, विजय पाटील दिनेश वळवी, दिलीप तडवी, रमेश महाजन , हेंद्र पवार आदी ग्रामसेवक उपस्थित होते.

तालुक्यात 937 घरकुले अपूर्ण
रावेर तालुक्यात पंतप्रधान आवास योजनेचे 348, रमाई घरकुल योजनेचे 440, शबरी घरकुल योजनेचे 149 असे एकूण 937 घरकुले विविध कारणामुळे अपूर्ण आहे. हे घरकुले पूर्ण करण्याच्या सूचना बैठकीत गट विकास अधिकारी दीपाली कोतवाल यांनी दिल्यानंतर लाभार्थींनाही मोठा दिलासा मिळाला आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !