वरणगाव मुख्याधिकारी शामकुमार गोसावी यांचा सत्कार
मंजूर पाणीपुरवठा योजनेसाठी कार्यारंभ आदेश देण्याची माजी नगराध्यक्ष सुनील काळेंची मागणी
भुसावळ : भाजपाच्या आंदोलनानंतर राज्य सरकारने वरणगाव पाणीपुरवठा योजनेवरील स्थगिती उठवली असून योजनेसाठी तत्काळ कार्यारंभ आदेश द्यावा, अशी मागणी माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी मुख्याधिकारी श्याम गोसावी यांच्याकडे शनिवारी केली. यावेळी नागरीक व लोकप्रतिनिधींतर्फे मुख्याधिकार्यांचा सत्कारही करण्यात आला.
यांची होती उपस्थिती
सत्कारप्रसंगी माजी नगराध्यक्ष सुनील काळे, उपनगराध्यक्ष शेख अखलाख, ईरफान पिंजारी, हाजी अल्लाउद्दीन सेठ, भाजपा शहराध्यक्ष सुनील माळी, शामराव धनगर, संजयकुमार जैन, अॅड.ए.जी.जंजाळे, किरण वंजारी, डॉ.सादीक, ज्ञानेश्वर घाटोळे, शोएब खान, डॉ.चांदणे, मिलिंद भैसे, डी.के.खाटीक, भाऊलाल टिंटोरे, जय चांदणे, कृष्णा माळी, संदीप माळी, आकाश निमकर, लखन माळी, तेजस जैन, पप्पू ठाकरे, हितेश चौधरी, राहुल जंजाळे, कमलाकर मराठे, गणेश चौधरी, सागर धुरंदर, नंदू पवार, शुभम पालवे व नागरीक उपस्थित होते. यावेळी मुख्याधिकारी शामकुमार गोसावी यांनी लवकरात लवकर मंजूर पाणीपुरवठा योजनेची वर्क ऑर्डर देण्याचे आश्वासन दिले.

मंजूर पाणीपुरवठा योजनेला त्काळ वर्कऑर्डर द्या : सुनील काळे
भाजपा सरकारच्या कार्यकाळात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी वरणगाव शहरासाठी 25 कोटी रुपये किमतीची योजना मंजूर केली होती परंतु ही योजना रखडली होती या योजनेवरील स्थगिती नुकतीच उठल्याने तत्काळ या योजनेला वर्कऑर्डर घेऊन काम सुरू करण्याची मागणी भाजपाचे माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी निवेदन देऊन केली आहे.
योजनेसाठी भाजपातर्फे अनेकदा आंदोलन
शहरात भारतीय जनता पार्टीच्या शासन काळामध्ये मंजूर योजना रखडल्याने भारतीय जनता पार्टीकडून आंदोलनाचा पवित्रा घेण्यात आला होता तसेच मंत्री मंडळाच्या बैठकीत या योजनेवरील स्थगिती उठविल्याने शनिवारी मुख्यधिकारी शामकुमार गोसावी यांना भेटून निवेदन देण्यात आले. त्याचा आशय असा की, शहराला पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. ही टंचाई टाळण्यासाठी तत्काळ कुणाच्याही दबावाला बळी न पडता तत्काळ वर्क ऑर्डर द्या अन्यथा हंडा मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे.

