जळगावात एटीएममध्ये रक्कम टाकण्याच्या बहाण्याने पाच लाख 63 हजार लांबवले


व्यवस्थापकांच्या तक्रारीनंतर रामानंद पेालिसात तिघांविरुद्ध गुन्हा

जळगाव- सीएमएस इन्फो सिस्टीम्स लि. या कंपनीच्या कर्मचार्‍यांनी एटीएममध्ये टाकण्यासाठी दिलेली पाच लाख 63 हजार 500 रुपयांची रोकड लांबवल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी व्यवस्थापकांच्या तक्रारीनंतर रामानंद पोलिसात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

तिघांविरुद्ध पोलिसात गुन्हा
सीएमएस इन्फो सिस्टीम्स लि.या कंपनीकडून टाटा इंडिकॅश कंपनीच्या एटीएममध्ये टाकण्याची जवाबदारी होती.
या एटीएममध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचा कंपनीच्या कॉल सेंटरकडून दिनेश प्रकाश पाटील याला सोमवारी दुपारी संदेश आला होता. यानंतर मी व राहुल संजय पाटील असे दोघे एरंडोल येथे असल्याने कंपनीतच कामावर असलेले मुकेश विलास शिंदे (रा.समतानगर) यास ही तांत्रिक अडचण सोडवण्यास सांगून सोळा अंकी गोपनिय पासवर्डही दिला होता, अशी माहिती दिनेशने कंपनीचे व्यवस्थापक महेंद्र पांडूरंग जोंबड यांना दिली. दिनेशच्या माहितीनुसार जोंबडे यांनी तत्काळ घटनास्थळ गाठून पाहणी केली असता, एटीएममधुन 500 रुपयांच्या नोंटांचे स्लॉट (एकूण नोटा-1127) असे 5 लाख 63 हजार 500 रुपये गायब असल्याचे आढळून आले. याप्रकरणी त्यांनी रामानंद नगर पोलिसात तक्रार दिली. तक्रारीत जोंबडे यांनी दिनेश पाटील, राहूल पाटील, व मुकेश शिंदे यांच्याविरोधात संशय व्यक्त केला होता. व्यवस्थापकाच्या तक्रारीनुसार रामानंदनगर पोलिसांनी या प्रकरणी दिनेश प्रकाश पाटील (रा.खडके बु.॥, ता.एरंडोल), राहुल संजय पाटिल (रा.खडके बु.॥, ता.एरंडोल) आणि मुकेश विलास शिंदे (रा.समतानगर) अशा तिघांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले.


कॉपी करू नका.