भुसावळातील संस्कृती फाउंडेशनतर्फे पर्यावरण पूरक बाप्पांचे विसर्जन


भुसावळ – संस्कृती फाउंडेशनतर्फे पर्यावरण पूरक गणरायाच्या मूर्तीचे दिंडी काढून विसर्जन करण्यात आले. ‘वृक्ष गणेश’ हा नाविन्यपूर्ण उपक्रमाच्या माध्यमातून कागदाच्या लगद्यापासून साकार झालेल्या 12 फूट गणपतीची स्थापना डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानात झाली होती. या गणपतीच्या माध्यमातून संस्कृती फाउंडेशनने भव्य जनजागृती सुद्धा उद्यानात केली. बुधवारी बाप्पांची आरती सर्व संस्कृतीच्या सदस्यांनी करून पालखीचा शुभारंभ आमदार संजय सावकारे यांनी केला.

आमदारांनी पालखी घेतली खांद्यावर
डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानापासून, गांधी पुतळा, पंचमुखी हनुमान मंदिर, कुळकर्णी प्लॉट ते महाराणा प्रताप चौक असा दिंडीचा मार्ग होता. यात समस्त भजनी मंडळांनी अभंग, टाळ मृदंगाच्या सुरात बाप्पाचे विसर्जन केले. बाप्पांच्या पालखीला खांद्यावर घेऊन संजय सावकारे यांनी बाप्पाच्या दिंडीचा शुभारंभ केला.

महाराणा प्रताप चौकात झाले बाप्पांचे विसर्जन
महाराणा प्रताप चौकात पूजेच्या शाडू मातीच्या मुर्तीचे विसर्जन आमदार संजय सावकारे व सहायक अधीक्षक रेल्वे मेल सर्व्हिस उल्हास दुसाने व संस्कृती सदस्यांच्या हस्ते करण्यात आले. भुसावळ शहरात प्रथमच असा पर्यावरण पूरक गणपती स्थापन करून त्याचे विसर्जन कृत्रिम कुंडात करण्यात आले.

यांनी घेतले परीश्रम
उत्सव यशस्वीतेसाठी संस्थाध्यक्ष रणजीतसिंग राजपूत, उपाध्यक्ष अश्फाक तडवी, अजीत गायकवाड, पवन कोळी, संस्कार मालविया, हर्षवर्धन बाविस्कर, तेजस्वी पाटील, विशाल पटेल, भाग्यश्री बाविस्कर, मानसी खडके, चेतन गायकवाड, मंगेश भावे, विद्या भावे, पराग चौधरी, नम्रता चांडक, तेजस गांधेले, सीमा अढळकर, किर्तीशा पाथरवट, गीतिका कोरी, अनिल जोशी, पल्लवी डांबरे, जितेश टाक, यश चांडक, यामिनी महाजन, सौरभ रणदिवे, संकेत सोनार, माधुरी विसपुते, हर्षल बोरवणकर, रवींद्र कुलकर्णी आदींनी परीश्रम घेतले.


कॉपी करू नका.