कुणाच्या किती बायका सांगू का ? अजित पवारांच्या खोचक वक्तव्याने उडाली खळबळ
पुणे : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप झालेली तक्रार त्या महिलेनेचे मागे घेतली आहे. भाजपवाले दबावामुळे तक्रार मागे घेतली अशी टीका करत आहेत. षआता जर इतरांच्या भानगडी बाहेर काढल्या तर विषय खूप लांब जाईल, कशाला खोलात जाण्यास सांगताय’, अशा शब्दांत अजित पवार यांनी भाजपाच्या नेत्यांचा समाचार घेत विरोधकांनी उगीच फाटे फोडू नये. कुणी काय-काय लपवाछपवी केली, कुणाचे लग्न झाले होते, कुणाला किती मुलं होती. लग्न झालं होतं की नाही झालं, कुणाच्या किती बायका आणि कुणी किती मुलं लपवली आहेत हे काय आम्हाला ठाऊक नाही का?, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
विरोधकांची केली झपाई
पुणे जिल्हा नियोजनच्या आढावा बैठकीला पवार आले असता त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना हा इशारा दिला. पवार म्हणाले की, धनंजय मुंडे यांनी करुणा शर्माबाबत जे सांगायचं होतं ते त्यांनी जाहीरपणे सांगितले आहे. केंद्र सरकारने जनतेच्या मागण्या लक्षात घ्याव्यात. ओबीसी जनगणना, कृषी कायद्यांवर त्यांनी निर्णय घ्यावा. आम्ही राज्यात कृषी कायदे लागू करणार नाही, असे मत राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडले.


