बोदवडला वाहनातून सात हजारांची बॅॅटरी लांबविली


बोदवड : घरासमोर लावलेल्या गाडीची सात हजार रुपये किंमतीची बॅटरी अज्ञात चोरट्याने लांबविल्याची घटना 24 रोजी रात्री नऊ वाजता घडली. या प्रकरणी बोदवड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. स्वस्तिक प्रदीपकुमार अग्रवाल (30, शालिमार टॉकीजजवळ नांदगाव रोड, बोदवड) यांच्या मालकीचे चारचाकी (एम.एच.19 सी.वाय.2961) वाहन 24 रोजी रात्री नऊ वाजता घरासमोर लावले असता अज्ञात चोरट्याने गाडीतून सात हजार रुपये किंमतीची बॅटरी लांबवली. सोमवार, 25 रोजी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !