बोदवडमधील अमर डेअरीचे मालक अमरलाल खत्री यांच्याविरुद्ध गुन्हा


बोदवड : शहरातील नाडगाव रस्त्यावरील अमर डेअरीचे मालक अमर खत्री यांनी आपल्या जुन्या अमर डेअरीच्या शेजारी मालमत्ता क्रमांक 60/97 या जागेवर अनधिकृतपणे अतिक्रमित बांधकाम केल्याने त्यांच्याविरुद्ध नगरपंचायत प्रशासनाकडून नगर अभियंता रीतेश भाऊसाहेब बच्छाव यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

अतिक्रमण केल्याने गुन्हा
30 नोव्हेंबर 2019 रोजी अनिल नारायण देवकर यांनी अमर डेअरीजवळ बांधकाम सुरू असल्याची तक्रार नगरपंचायत कार्यालयात केली हेती. बांधकाम लिपिक गणेश सुपडू हिवरळे यांनी पाहणी केली असता हे बांधकाम भिंतीसह इतर बांधकाम हे नगरपंचायत मालमत्ता क्रमांक 60/97 या जागेवर झाल्याचे दिसून आले शिवाय या बांधकामासाठी कोणतीही रीतसर परवानगी नगरपंचायत कार्यालयातून घेण्यात आली नसल्याची बाब उघड झाली. 4 डिसेंबर 2019 रोजी अतिक्रमण धारक अमर खत्री यांना नोटीस बजावण्यात आली. कागदपत्रे सादर करण्याचे बजावूनही संबंधितानी दखल घेतली नाही शिवाय त्यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाली. नगरपंचायतीकडे सादर केलेले झेरॉक्स अस्पष्ट वाचण्यायोग्य नसल्याने त्यांना 17 सप्टेंबर 2020 रोजी कागदपत्रे स्पष्ट प्रतीत कार्यालयात सादर करण्याचे पत्र देण्यात आले मात्र त्यांनी कागदपत्रे सादर केली नाहीत. त्यामुळे अर्ज निकाली काढण्यात येवून अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी अमर डेअरीचे मालक अमरलाल परमानंद खत्री यांच्या वरुद्ध बोदवड पोलिस स्टेशनमध्ये कलम 53 (1) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास वसंत निकम करीत आहेत.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !