मुंबई-पुणे तसेच हुजूर साहिब-नांदेड दरम्यान विशेष गाड्या धावणार
भुसावळ : मुंबई-पुणे तसेच हुजूर साहेब-नांदेड दरम्यान विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.
मुंबई-हुजूर साहिब नांदेड विशेष गाड्या
07618 मुंबई-हुजूर साहिब नांदेड विशेष गाडी 27 जानेवारीपासून पुढील आदेशापर्यंत धावणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून दररोज 6.15 वाजता गाड्या सुटल्यानंतर त्याच दिवशी सायंकाळी सहा वाजता ही गाडी हुजूर साहिब नांदेडला पोहोचणार आहे. या गाडीला देवळली, नाशिक रोड, निफाड, लासलगाव रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. 07617 हुजूर साहिब-नांदेड विशेष गाडी पुढील आदेशापर्यंत नांदेड येथून दररोज 10.5 वाजता सुटल्यानंतर त्याच दिवशी रात्री 9.55 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबईला पोहोचणार आहे. या गाडीला मनमाड, लासलगाव, निफाड, नाशिक रोड, देवळाली रेल्वे स्थानकासह रोटेगाव, लासूर, औरंगाबाद, जालना, परतूर, सेलू, मानवत रोड, परभणी आणि पूर्णा स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. या गाडीला दोन वातानुकूलित चेअर कार, 16 द्वितीय आसन श्रेणी बोगी जोडण्यात येणार आहेत.

पुणे-हुजूर साहिब नांदेड सुपरफास्ट एक्स्प्रेस
02729 पुणे-हुजूर साहिब नांदेड सुपरफास्ट विशेष (द्वि -साप्ताहिक) एक्स्प्रेस पुढील आदेशापर्यंत 27 जानेवारीपासून पुणे येथून सोमवारी आणि बुधवारी 10 वाजता सुटल्यानंतर दुसर्या दिवशी हुजूर साहिब नांदेडला 10 वाजता पोहोचणार आहे. या गाडीला मनमाड स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. 02730 हुजूर साहिब नांदेड-पुणे विशेष गाडी 26 जानेवारीपासू पुढील आदेशापर्यंत नांदेड येथून दर मंगळवारी व रविवारी 9.30 वाजता सुटल्यानंतर पुण्याला दुसर्या दिवशी 9.40 वाजता पोहोचणार आहे. या गाडीला मनमाड, दौंड कॉर्ड, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव,
औरंगाबाद, जालना, परतूर, सेलू, परभणी आणि पूर्णा स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. या गाडीला एक द्वितीय वातानुकूलित, एक तृतीय वातानुकूलित, सात शयनयान, आठ द्वितीय आसन श्रेणी बोगी जोडण्यात येणार आहे. गाडी 02729 आणि 07618 विशेष गाड्यांसाठी 24 जानेवारीपासून संगणकीत आरक्षण केंद्रांवर आणि रेल्वेच्या संकेत स्थळावर बुकींग सुरू करण्यात आले आहे. केवळ कन्फर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष गाड्यांमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येईल तसेच प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविड-19 शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागणार आहे.


