एणगाव जी.डी.हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांकडून ‘सेल्फी वुईथ रंगोली’


बोदवड : तालुक्यातील एणगाव येथील जी.डी.हायस्कूलमध्ये 25 जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘सभी मतदाता बने सशक्त, सतर्क, सुरक्षित एवं जागरूक’ या विषयावर रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. कोविड-19 च्या सूचनांचे पालन म्हणून शाळेत एकत्र न येता विद्यार्थ्यांनी आपल्या घरीच अंगणात किंवा घराच्या दर्शनी जागेवर रांगोळी काढून सेल्फी वुईथ रंगोली या उपक्रमाद्वारे आपल्या वर्गाच्या व्हॉट्सप ग्रुपवर काढलेल्या रांगोळीचा स्वतंत्र सेल्फी फोटो शेअर करण्याबाबत मुलांना सूचना देण्यात आल्या होत्या. त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद देत शाळेतील 5 ते 10 च्या फक्त मुलींनीच सहभाग न नोंदवता मुलांनीही सहभाग नोंदवला. स्पर्धेच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी आपल्या दारासमोर रांगोळी काढल्यामुळे राष्ट्रीय मतदार दिन फक्त शाळेपर्यंत मर्यादित न राहता संपूर्ण गावात मतदार जागृतीचे वातावरण निर्माण झाले. वर्क फ्रॉम होम व डिजीटल साधनांचा मेळ घालून सेल्फी वुईथ रंगोलीचा कार्यक्रम राबवून एणगाव येथील जी.डी.हायस्कूलने अनोखा राष्ट्रीय मतदार दिन साजरा केला.

यांनी पटकावला क्रमांक
राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आयोजित रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रमांक शीतल गोकुळ तायडे (नववी), द्वितीय प्रतीक्षा भास्कर लवंगे, साक्षी विनोद झटकार (आठवी), तृतीय रेणुका निलेश भोळे (पाचवी) व स्नेहल जीवन पाटील (सहावी) यांनी पटकावले.


यांनी घेतले परीश्रम
व्हॉटसअपद्वारे ऑनलाईन रांगोळी स्पर्धा यशस्वी करण्याासाठी शाळेचे तंत्रस्नेही शिक्षक एम.पी.कोळी, एस.टी.पावरा, एस.ए.पाटील, आर.के.भंगाळे यांनी मुख्याध्यापक पुरुषोत्तम गड्डम, ज्येष्ठ शिक्षक जी.जी.जावळे, पी.एस.बोंडे, एन.आर.राजपूत, एस.व्ही.वराडे यांच्या मार्गदर्शनाखाली परीश्रम घेतले. बोदवड प्रभारी तहसीलदार डी.एस.कुसकर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेने मतदार जनजागृती केली. दरम्यान, नववी आणि दहावीचे विद्यार्थी आणि शिक्षक बांधवांनी प्रभारी तहसीलदार डी.एस.कुसकर यांच्या समवेत मतदान जागृती निर्माण होण्याची शपथ घेतली. शपथ वाचन एन.आर.राजपूत यांनी केले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !