मुंबई-साईनगर शिर्डी दरम्यान त्री-साप्ताहिक सुपरफास्ट विशेष गाडी धावणार


भुसावळ : रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी पुढील सूचना मिळेपर्यंत मुंबई-साईनगर शिर्डी दरम्यान त्री-साप्ताहिक सुपरफास्ट विशेष गाडी चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.

मुंबई-शिर्डी सुपरफास्ट एक्स्प्रेस
डाऊन 01131 मुंबई-शिर्डी सुपरफास्ट एक्स्प्रेस 1 फेब्रुवारीपासून दादर येथून दर सोमवार, बुधवार आणि शनिवारी 9.45 वाजता सुटल्यानंतर दुसर्‍या दिवशी दुपारी 3.45 वाजता शिर्डीला पोहोचणार आहे. या गाडीला
ठाणे, कल्याण, नाशिकरोड, मनमाड, कोपरगाव रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. अप 01132 शिर्डी-दादर विशेष एक्स्प्रेस 2 फेब्रुवारीपासून दर मंगळवार, गुरुवार आणि रविवारी 10.25 वाजता शिर्डी येथून सुटल्यानंतर दुसर्‍या दिवशी दादरला दुपारी साडेचार वाजता पोहोचणार आहे. या गाडीला कोपरगाव, मनमाड, नाशिक, कल्याण, ठाणे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. या गाडीला एक वातानुकूलित द्वितीय श्रेणी, दोन वातानुकूलित तृतीय श्रेणी, सात शयनयान आणि सात द्वितीय श्रेणी बोगी जोडण्यात येणार आहे. पूर्णपणे आरक्षित असलेली विशेष गाडी 01131/01132 साठी आरक्षण सामान्य भाडे दराने 27 जानेवारीपासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणिुु रेल्वेच्या संकेतस्थळावर सुरू करण्यात आले आहे. केवळ कन्फर्म तिकीट प्रवाशांना गाडीत प्रवेश मिळणार असून प्रवाशांना कोरोना नियमांचे पालन करावे लागणार आहे.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !