चोरट्यांचा स्वस्त धान्य दुकानातील धान्यावर डल्ला


यावल : शहरातील म्हसोबा परीसरातील मुख्य रस्त्यावरील यावल सहकारी ग्राहक भांडार दुकान क्रमांक 18 मधून चोरट्यांनी पाच क्विंटल गव्हासह अडीच क्विंटल मका चोरून नेल्याची घटना 25 रोजी मध्यरात्रीघडली. या प्रकरणी यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरट्यांनी दुकानाचे कुलूप तोडून दुकानातील 10 हजार रुपये किंमतीचा गहू तर सुमारे तीन हजार रुपये किंमतीचा मका लांबवला. तपास पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !