साकेगाव शिवारातून दोन दुचाकी लांबवल्या
भुसावळ : मोबाईलवर कॉल आल्यानंतर दुचाकीस्वाराने रस्त्याच्या कडेला दुचाकी लावताच चोरट्याने दुचाकी लांबवल्याची घटना सोमवारी पहाटे 3.30 वाजता ग्रामीण रूग्णालयाजवळ घडली. तालुक्यातील गोजोरा येथील रहिवासी ज्ञानेश्वर शांताराम पाटील हे सोमवारी पहाटे 3.30 वाजता साकेगाव शिवारातून जात असतांना त्यांच्या
मोबाईलवर फोन आल्याने त्यांनी गाडी ग्रामीण रुग्णालयाजवळ थांबवून ते मोबाईलवर बोल असतानाच चोरट्याने शाईन मोटर सायकल (एम.एच.19 सी.सी.426) ही लांबवली. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरूध्द चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. दुसर्या घटनेत साकेगाव येथील महामार्गावरील बस थांबा असलेल्या ठिकाणी शेख इरफान शेख मस्तान (रा. पटेल गल्ली, साकेगाव) यांनी त्यांची दुचाकी (एम.एच.19 डी.जे. 7558) लावून ते कामावर गेल्याची संधी चोरट्याने साधली. 23 जानेवारीला सकाळी 7.30 वाजता ही घटना घडली. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.



