पहिल्याच दिवशी शाळेकडे विद्यार्थ्यांची पाठ


कोरोनाचे संकट कायम : अवघ्या दोन टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती

भुसावळ : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मार्चपासून बंद असलेल्या माध्यमिक शाळांना 27 जानेवारीच्या मुहूर्तावर कोरोना नियमांचे पालन करून सुरू करण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले असलेतरी तरी बुधवारी केवळ दोन टक्के विद्यार्थ्यांनी शहरासह तालुक्यातील शाळांमध्ये उपस्थिती दिली. अपलॉकच्या पहिल्या टप्प्यात 9 ते 12 वीचे वर्ग 8 डिसेंबरपासून सुरू करण्यात आले तर 27 जानेवारीपासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. शहरातील
के. नारखेडे विद्यालयात पहिल्या दिवशी 201 विद्यार्थी-विद्यार्थीनी आल्या. अनेकांजवळ संमती पत्र नसल्याने पालकांचे संमतीपत्र गुरूवारी घेऊन येण्याच्या सूचना करण्यात आल्या. डी.एस.हायस्कूलमध्येही विद्यार्थी आलेले नव्हते, मात्र शिक्षक शाळेत हजर होते. बोटावर मोजण्या इतके विद्यार्थी शाळेत आले होते. अहिल्या देवी शाळेत
100 विद्यार्थीनी हजर होत्या. तालुक्यातील 103 शाळांमध्ये 45 हजार 828 पटसंख्या असलीतरी अवघे 2.15 टक्केच विद्यार्थी शाळेत आल्याचे सांगण्यात आले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !