कोरोना : जळगाव जिल्ह्यात 32 रुग्ण आढळले


जिल्ह्यातील बाधीतांची संख्या पोहोचली 56 हजार 915 वर : एकाच दिवसात 45 रुग्णांची कोरोनावर मात : 24 तासात दोघा रुग्णांचा मृत्यू

जळगाव : जिल्ह्यात बुधवारी कोरोनाचे 32 रुग्ण आढळले असून त्याबाबत प्रशासनाला सायंकाळी अहवाल प्राप्त झाला आहे तर आतापर्यंत कोरोनामुळे 1354 रुग्णांचा मृत्यू ओढवला. जिल्ह्यात आतापर्यंत 56 हजार 915 नागरीकांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील 55 हजार 173 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे तर बुधवारी एकाच दिवसात 45 रुग्णांनी कोरोनावर मात केली तर गेल्या 24 तासात दोघा रुग्णांचा मृत्यू झाला.

बुधवारी या शहरात आढळले बाधीत
जळगाव शहर 13
जळगाव ग्रामीण 00
भुसावळ 03
अमळनेर 00
चोपडा 01
पाचोरा 00
भडगाव 00
धरणगाव 00
यावल 01
एरंडोल 02
जामनेर 00
रावेर 04
पारोळा 05
चाळीसगाव 03
मुक्ताईनगर 00
बोदवड 0
अन्य जिल्हा 00


24 तासात दोन रुग्णांचा मृत्यू
गेल्या 24 तासात भुसावळ तालुक्यातील 69 वर्षीय पुरूष व चोपडा तालुक्यातील 52 वर्षीय पुरूषाचा डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !