भुसावळ विभागात प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण उत्साहात


शाळा-महाविद्यालयांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन

भुसावळ : भुसावळ शहर व परीसरात 72 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळा-महाविद्यालय तसेच शासकीय कार्यालयांमध्ये मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कोरोना नियमांचे पालन करून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

बाजार समितीत सभापतींनी केले ध्वजारोहण
भुसावळ : भुसावळ कृषी उत्पन्न बाजार समितीत सभापती सचिन संतोष चौधरी यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रसंगी उपसभापती अशोक पाटील, संचालक गव्हाणे, उमेश चौधरी, प्रकाश चौधरी, प्रवीण चौधरी, धीरज बर्‍हाटे, दीपक काटकर, योगेश चौधरी, अनिल तेली, पी.सावकारे, आबा सेठ, व्यापारी, शेतकरी, कर्मचारी उपस्थित होते. विशेष म्हणजे यंदा कृउबा आवारात मोठ्या प्रमाणावर सजावट करण्यात आली होती शिवाय व मोठ्या संख्येने नागरीकही उपस्थित होते.


भुसावळ विभागात ध्वजारोहण उत्साहात
भुसावळ : रेल्वे क्रीडांगणावर सकाळी डीआरएम विवेककुमार गुप्ता यांच्यास्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी आरपीएफ कर्मचार्‍यांनी ध्वजाला वंदन करून सलामी दिली तसेच परेडला सुरूवात झाली. या परेडमध्ये सशस्त्र, निशस्त्र, तथा रेल सुरक्षा बलाच्या तीन तुकड्या, रेल्वे स्कूलचे विद्यार्थी,
स्काऊट तथा गाईड सहभागी झाले. डॉग शोचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी अपर मंडळ रेल्वे प्रबंधक मनोजकुमार सिन्हा आणि सर्व विभागाचे सर्व शाखांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. विविध विभागांना पुरस्कार घोषित करण्यात आले.
सूत्रसंचालन रेल्वे स्कूलचे प्राचार्य सतीश कुलकर्णी यांनी तर आभार वरीष्ठ मंडळ कार्मिक अधिकारी एन.डी.गांगुर्डे यांनी मानले.

धनाजी नाना महाविद्यालय
फैजपूर : तापी परीसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयात 72 व्या प्रजासत्ताक दिनाच्या औचित्याने ध्वजारोहण सोहळा उत्साहात झाला. लोकसेवक मधुकरराव चौधरी औषधनिर्माण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर व्ही.आर.पाटील यांच्याहस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी औषधनिर्माण पदविका महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.एल.चौधरी, महाविद्यालयातील सी आर.पी.एफ.मध्ये कार्यरत कॅडेट पंकज कोळी, उपप्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, कॅडेट्स उपस्थित होते. यशस्वितेसाठी राष्ट्रीय सण आणि उत्सव समितीचे चेअरमन डॉ.आय.पी.ठाकुर, एनसीसी अधिकारी लेफ्टनंट राजेंद्र राजपूत, नितीन सपकाळे, शेखर महाजन, चेतन इंगळे, नारायण जोगी, संतोष तायडे, कैलास चंदनशीव, ललित पाटील, प्रमोद अजलसोंडे, पराग राणे यांनी परीश्रम घेतले.

पार्सल कार्यालयात ध्वजारोहण
भुसावळ : वाणिज्य विभागातर्फे 72 वा गणतंत्र दिवस पार्सल ऑफिस भुसावळमधे साजरा करण्यात आला. यावेळी वरीष्ठ मंडळ वाणिज्य प्रबंधक युवराज पाटील यांच्याहस्ते झेंडा वंदन करण्यात आले. मंडळ वाणिज्य प्रबंधक बी.अरुण कुमार, सहा.वाणिज्य प्रबंधक (माल) अनिल बागले, सहा.वाणिज्य प्रबंधक (टी.जा.) अनिलकुमार पाठक, मंडळ वाणिज्य निरीक्षक संजय चापोरकर, राजशिष्टाचार अधिकारी जीवन चौधरी, मुख्य वाणिज्य निरीक्षक सुदर्शन देशपांडे, आर.डी.क्षीरसागर, शैलेश पारे, प्रकाश ठाकूर, मुख्य पार्सल पर्यवेक्षक हितेंद्र आव्हाड, सर्व वाणिज्य कर्मचारी उपस्थित होते.

भुसावळ शहर काँग्रेस कमेटी
भुसावळ : नेहरू मैदानावर भुसावळ शहर काँग्रेस कमेटीतर्फे अल्पसंख्यांक विभागाचे शहराध्यक्ष सलिम हुसेन गवळी यांच्याहस्ते ध्वजारोहण झाले. माजी आमदार नीळकंठ फालक, माजी तालुकाध्यक्ष विष्णू चौधरी, भुसावळ शहराध्यक्ष रवींद्र निकम, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष मुन्वर खान, जिल्हा सरचिटणीस रहिम कुरेशी, महिला प्रदेश सरचिटणीस अनिता खरारे, खडका ग्राम पंचायत सदस्य आमीर खान (छोटुभाई), युवकचे तालुकाध्यक्ष इमरान खान अकील शाह, फकरुदिन भाई बोहरी, संजय खडसे, विलास खरात, संतोष साळवे, शैलेश अहिरे, विजय तुरकेले, प्रदीप नेहेते, शैलेंद्र ननवरे, कलिम बेग, अन्वर तडवी, सुनील जवरे, मीनाक्षी जावरे, रमजान खाटीक, अ‍ॅड.रमू पटेल, रामअवतार परदेशी, अनिल ईदा, जॉनी गवळी, अकबर गवली, इसाक चौधरी, मोहम्मद नईम, महेंद्र महाले, हमीदा गवळी, राणी खरात, सुजाता सपकाळे, दुर्गाबाई सोनवणे आदींची उपस्थिती होती.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !